शालेय परसबाग स्पर्धा 2024
राज्यस्तरीय बालकांचे हक्क व सुरक्षितता ऑनलाईन तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न
शिरपूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत ऑनलाईन प्रवेश देणे सुरु
"शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ ऑनलाईन प्रवेश सुरू"
मा.गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती,शिरपूर यांच्या मार्गदर्शनात व सर्व शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षक यांच्या सहकार्याने "ऑनलाईन प्रवेश सुविधा मार्फत" फक्त शिरपूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा प्रवेश वय वर्षे 6 पूर्ण झालेल्या बालकाना तसेच पुढील वर्षी नवीन बाहेर गावाहून आलेले मुलांना साठी प्रवेश सुरू झाला आहे .
(गट साधन केंद्र मार्फत उपक्रमची सुरुवात :- श्री मनोहर वाघ सर -साधनव्यक्ती ९७६३२३६०७० हे संचालन करीत आहेत )
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सर्व तालुक्यातील पालक वर्गास विनंती आहे कि , "कोरोना व्ह्ययरस" मुळे देशात व राज्यात लॉकडाऊन सुरु असल्याने ६ वर्ष पूर्ण झालेले बालकांना आपल्या गावातील किंवा नजीकच्या गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्यात कोणतीही अडचणी येऊ नयेत या साठी गट साधन केंद्र , पंचायत समिती शिरपूर यांनी "ऑनलाईन शाळा प्रवेश " हा अभिनव उपक्रम सुरु केला असून याचा लाभ सर्व तालुक्यातील पालकांनी घ्यावा असे अवाहन मा. श्री.एस.सी.पवार ,गटशिक्षणाधिकारी शिरपूर यांनी केले आहे . तसेच सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षक यांचे सहकार्य लाभत आहे . सदर उपक्रमाची संकल्पना श्री.मनोहर वाघ सर तंत्रस्नेही साधनव्यक्ती यांची असून सर्व माहितीचे संकलन ते स्वतः करून सर्व शिक्षकांना शाळा निहाय याद्या पुरविणार आहेत कोणत्याही शिक्षक बंधू भगिनींना अतिरिक्त कोणतेही काम करावे लागणार नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➽ ज्या पालकांना ऑनलाईन प्रवेश घेण्यास अडचणी येत असतील त्यांनी ९७६३२३६०७० या मोबाईल क्रमांक वर संपर्क करावा प्रवेशा बाबत मदत मिळेल .
➽ ज्या पालकांना ऑनलाईन प्रवेश माहिती भरता येत नसेल त्यांनी ९७६३२३६०७० ह्या वॉटस अप्स नंबर वर आपली माहिती पाठवा ती भरून प्रवेश घेता येईल. ( विद्यार्थी चे नांव /जन्म तारीख /प्रवेशित वर्ग -इयत्ता /गावाचे नाव. इत्यादी माहिती पाठवा )
************************************************************************
ऑनलाईन प्रवेश साठी समोरील फोटो वर क्लिक करा.
किंवा
ऑनलाईन प्रवेश साठी समोरील मुलाच्या फोटो वर क्लिक करा
धन्यवाद पंचायत समिती शिक्षण विभाग आपले आभारी आहे .
प्रधानमंत्री किसान मानधन योजना बाबत सहविचार सभा संपन्न झाली
आज दिनांक५ सप्टेंबर गुरुवार सकाळी ८ वाजता जि.प. शाळा बलकुवे येथे श्रीक्षेत्र विठ्ठल मंदिर बलकुवे येथे प्रधानमंत्री किसान मानधन योजना अंर्तगत शेतकरी मेळावा घेण्यात आला या प्रसंगी अर्थे बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री आदरणीय डी.पी. बुवा साहेब यांनी गावातील उपस्थित शेतकऱ्या ना मार्गदर्शन केले व शेतकऱ्यानी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली त व सर्वानी योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले या प्रसंगी गांवातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते .व तसेच शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री अशोक गंगाराम पाटील व बलकुवे तंटामुक्ती अध्यक्ष जगदीश अप्पा व बलकुवे पोलीस पाटील रावण नाना व सरपंच लताबाई भील व व्यंकट भी ल तसेच मुखेड शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र पाटील व राजेंद्र पाटील सर बलकुवे शाळेचे श्री अशोक बडगुजर सर शाम पाटील सर उपस्थित होते कार्य क्रमाचे प्रास्ताविक नंदु पाटील सर यांनी केले व आभार तंटामुक्ती अध्यक्ष श्री जगदीश अप्पा यांनी केले व योजनेसाठी सर्व ग्रामस्थ यांना सहभागाचे आव्हान केले .
मोफत जिल्हास्तरीय अलिम्को मोजमाप शिबीर
*मोफत जिल्हास्तरीय अलिम्को मोजमाप शिबीर*
अलिम्को संस्थेमार्फत आवश्यक असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थी चे मोजमाप शिबिर आयोजित केले आहे तरी आपल्या केन्द्राअन्तर्गत शाळेतील व अंगवाडीतिल जे 0 ते 18 वयोगटाचे *मतिमंद, बहुविकलांग,सेरेब्रल पालसी अस्थिव्यंग* विद्यार्थी असतील त्यांना
*दि.26/08/2019 वार सोमवार रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता डायट धुळे येथे आयोजित केलेले आहे*
१) *यादि व्यतिरीक्त विद्यार्थी उपस्तित राहिले तरी चालेल*
२) *सदर शिबिर हे एकदाच होते विद्यार्थी वंचित ठेवू नये*
3) *सदर शिबिरासाठीआवश्यक कागद पत्र*
*उत्पन्नाचा दाखला (तलाठी,ग्रामसेवक सरपंच,ई)* *अपंगत्व प्रमाणपत्र (विद्याथी)*
*अपंगत्व दिसेल असे दोन फ़ोटो*
*विद्यार्थी व पालक आधार कार्ड*
*पालक बैंक पास बुक झेरॉक्स*
*शिबिर स्थळ*- *जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास संस्था,धुळे(डायट)*
*गरुड मैदान समोर , धुळे*
शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी आपल्या अधिनस्त असलेल्या केंद्रातील/शाळेतील दिव्यग विद्यार्थिना
सदर शिबीराकरीता उपस्थित ठेवावे
त्या बाबत काही समस्या असल्यास खालील विशेष शिक्षकाना संपर्क करावा.
📌श्री.पुरुषोत्तम बागुल 9511672530
📌श्री.प्रमोद भोई 9850962400
📌श्री. मोतीलाल पाटील 7020115750
📌श्री. निलेश मराठे 8087992175
📌 श्री राहुल पाटील 9579056742
📌 कु स्वाती देवांग 7020340258
📌श्री बाळा बोरकर 8805581853
*गटशिक्षणाधिकारी*
*गटसाधन केंद्र पंचायत समिती शिरपूर*
उमर्दा केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न
⚜ *केंद्रस्तरीय शिक्षण परीषद* ⚜
🔰 *तालुका - शिरपूर, जि.धुळे*🔰
⚜ *दि.24/07/2019 बुधवार*
⚜केंद्र - उमर्दा बीट -: बोराडी
⚜स्थळ - जि.प.शाळा दुर्बळ्या ता.शिरपूर
🌹🥀 *उपस्थिती*🥀🌹
🔅 *मा श्री पी झेड रनदिवे साहेब* (गटशिक्षणाधिकारी)
🔅 *मा.श्री के व्ही भदाणे साहेब* (केंद्रप्रमुख,उमर्दा केंद्र)
🔅 *मा श्री एस एन चव्हाण साहेब* (मा.जि केंद्रप्रमुख उमर्दा )
🔅 *मा श्री मनोहर वाघ सर* (तंत्रस्नेही साधनव्यक्ती)
तसेच
🔅 *केंद्रांतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद*
🔅 *मा श्री पी झेड रनदिवे साहेब (गटशिक्षणाधिकारी शिरपूर)यांचे मार्गदर्शन मुद्दे व चर्चा*
1. शालेय पोषण आहार
2. पूरक आहार शंका निरसन
3. गणित/भाषा पेटीचा परिणामकारक वापर
4. गणवेश प्रक्रिया माहिती
5. शाळा व्यवस्थापन समिती सबलीकरण
6) प्रशासकीय सूचना..
🔅 *मा.श्री के व्ही भदाणे साहेब (केंद्रप्रमुख )यांनी खालील विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन केले*
1) मागील शिक्षण परिषदेत घेतलेल्या विषयांचा आढावा.
2)शिक्षण परिषदांचे वार्षिक नियोजन
3) *CRG समिती स्थापन*
4) शाळा इमारत निर्लेखन माहिती..
5)शाळेवार उपस्थिती आढावा..
6) शालेय पोषण आहार...
7) प्रशासकीय विषय..
8)शाळा भेटीतील अनुभव..
9) गुणवत्ता विकास....
🔅 *मा श्री के बी पवार* तंत्रस्नेही शिक्षक यांचे चर्चेतील मुद्दे
1 *PGI (Performance Grading Index)* बाबत माहिती
2.अध्ययन निष्पत्ती आधारित गणित/ भाषा कृती कार्यक्रम चर्चा
3 *अध्ययन निष्पत्ती* आधारित अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना देणे.
4 गणित/भाषा पेटीचा परिणामकारक वापर करण्यासंदर्भात चर्चा..
5)CRG समिती बाबत माहिती..
6) इतर...
🔅 शिक्षण परिषदेचे *सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन* श्री ज्ञानेश्वर डोळे सर ( जि प शाळा दुर्बळ्या ) यांनी केले.
🔅 *मा जि केंद्र प्रमुख मा श्री एस एन चव्हाण साहेबांना केंद्रातील सर्व शिक्षकवृंद यांच्याकडून निरोप देण्यात आला व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या*
🔅 *शिक्षण परिषद यशस्वीतेकरिता जि प शाळा दुर्बळ्या येथील मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष प्रयत्न केले*
*शब्दांकन*✍
*Kbpawar*🥀🌹🙏
मोहिदा येथे डिजीटल रूमचा लोकार्पण सोहळा संपन्न
*मोहिदा येथे डिजीटल रूमचा लोकार्पण सोहळा*
आज दि. 24.07.2019 रोजी जि.प.शाळा मोहिदा येथे मा.प्रकाशजी रणदिवे (ग.शि.आ.शिरपूर),मा.डाॅ निताजी सोनवणे (शि.वि.अ.सांगवी), मा.किशोरजी भदाणे (के.प्र.पळासनेर) व मा. बाबुलाल पावरा (अध्यक्ष शा.व्य.स.मोहिदा) यांच्या हस्ते डिजिटल रूमचे लोकार्पण करण्यात आले.
याच महिन्यात 15 दिवसांपूर्वी मा. रणदिवे साहेबांनी शाळेला भेट दिली होती. त्यावेळी साहेबांनी तिन्ही शिक्षकांना लवकरात लवकर डिजिटल रुम तयार करण्याचे आवाहन केले व 2000 रु. वर्गणी दिली होती. तिन्ही शिक्षकांनी स्वखर्चाने 15 च दिवसात डिजिटल रुम तयार केली व मला उद्घघाटनासाठी बोलवले याबद्दल साहेबांनी आनंद व्यक्त केला. मा.सौ.सोनवणे मॅडम व मा. श्री भदाणे सर यांनीही समाधान व्यक्त केले.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मग डिजिटल रूमचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गुलमोहराचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.उमाकांत गुरव यांनी केले. प्रास्ताविक श्री ईश्वर पावरा व आभार प्रदर्शन श्री मुकेश कोष्टी यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते श्री सी. एस पाटील (मुख्याध्यापक शेमल्या) श्री रा.का.पाटील (मुख्याध्यापक पळासनेर), श्री स्वप्निल पावरा (पोलीस पाटील मोहिदा), श्री मनोहर वाघ(विशेष साधन व्यक्ती), श्री प्रमोद भोई (समावेशीत साधन व्यक्ती ), श्री समाधान बोरकर (विशेष शिक्षक), श्री विजयानंद शिरसाठ, श्री के. बी. पवार, श्री मधुकर थेले व गावातील शिक्षणप्रेमी नागरीक बैसाणे आप्पा,निता पावरा, सीमा पावरा, रंजना पावरा, योगिता पावरा, अशोक पावरा, हिरालाल पावरा,नारसिंग पावरा, सुनिल बैसाणे, मुकेश पावरा, इखला पावरा आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शा.व्य.स.अध्यक्ष बाबुलाल पावरा, मुख्याध्यापक ईश्वर पावरा, सह शिक्षक मुकेश कोष्टी व उमाकांत गुरव यांनी परिश्रम घेतले.
नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवणार शिरपूर तालुका
*मा.डॉ.विद्या पाटील मॅडम (प्राचार्य, DIECPD, धुळे) यांची शिरपूर तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता सुसंवाद व सुलभकाच्या भूमिकेतून बहुउद्देशीय मार्गदर्शनपर भेटी*
*दि.28/11/2018 बुधवार*
आज दि.28/11/2018 बुधवार रोजी *मा.प्राचार्य डॉ. विद्या पाटील मॅडम* यांनी सुरुवातीस शिरपूर तालुक्यातील न.प.उर्दू शाळा क्र.5 येथे असलेल्या *नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रास* भेट दिली. प्रत्यक्ष शाळेतील लॅब व उपकरणं यांची पाहणी करून मुख्याध्यापक श्री.बिलाल सर आणि प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांसोबत खालील विषयावर चर्चा केली :-
溺विज्ञान केंद्राची सद्यस्थिती व लाभ घेतलेल्या शाळा व विद्यार्थ्यांची माहिती
溺नोंदी ठेवलेले रजिस्टर व इतर रेकॉर्ड बाबत जाणून घेतले
溺सर्व विद्यार्थ्यांना उपकरणं हाताळण्याचे कौशल्य विकसित करणे, सर्व प्रयोगांचे QR कोड scan करून you tube वरील प्रयोगाचे व्हिडिओ बघणे, प्रयोग पुस्तकाचा संदर्भ म्हणून वापर करणे याबाबत मार्गदर्शन केले.
溺शहरातील सर्व शाळा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान केंद्राचा लाभ देण्याबाबत नियोजन करण्याचे सूचित केले.
⚗溺裂匿離
यानंतर मा.प्राचार्य डॉ.विद्या पाटील मॅडम यांनी शं.पा.माळी माध्य.विद्यालय येथे *गटशिक्षणाधिकारी मा.पी.झेड.रणदिवे साहेब* आणि सर्व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या *माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी आयोजित सहविचार सभेस खालील विषयांवर चर्चा व मार्गदर्शन केले :-*
हंगामी स्थलांतरित विदयार्थी व उपाययोजना
नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राचा लाभ विद्यार्थ्यांना देणेसाठी भेटींचे नियोजन
DIECPD धुळे येथे नव्याने सुरू झालेल्या *व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन* या कक्षाबाबत सविस्तर माहिती
विविध शैक्षणिक उपक्रम
✅ *मा.प्राचार्य मॅडम यांनी गटशिक्षणाधिकारी मा.पी.झेड.रणदिवे साहेब यांच्या उत्कृष्ठ नियोजन व सक्षम प्रशासन कौशल्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.*
*मा.रणदिवे साहेब यांनी सहविचार सभेत खालील विषयांवर चर्चा व मार्गदर्शन केले :-*
नवोदय विद्यालय परीक्षा 2019
बेटी बचाव बेटी पढाव मोहीम
मानव विकास मिशन सायकल खरेदी आढावा
बालभवन भेटी आढावा व नियोजन
तंबाखूमुक्त अभियान केलेली कार्यवाही
विज्ञान प्रदर्शन 2018 नियोजन
स्थलांतर व शाळाबाह्य विद्यार्थी
शा पो आहार दूध भुकटी आढावा
गोवर रुबेला लसीकरण मोहीम 2018 आढावा
⏰सहविचार सभा आटोपून *मा. प्राचार्य डॉ.विद्या पाटील मॅडम यांनी नव्याने सुरू झालेल्या जि.प.शाळा उगबुड्यापाडा येथे भेट दिली.* भेटीदरम्यान सोबत केंद्रप्रमुख मा.मल्हारी सूर्यवंशी सर, विषय सहाय्यक श्री.हेमकांत अहिरराव तसेच विषयसाधनव्यक्ती श्री.सचिन जडिये उपस्थित होते.
*शाळाभेटीदरम्यान अनुभव :-*
शाळेमध्ये मा.प्राचार्य मॅडम यांनी शाळेवरील शिक्षक श्री.नीतीन वाघ सर आणि सर्व विद्यार्थी यांचे सोबत परिचय करून चर्चा केली.
विद्यार्थ्यांना गटामध्ये बसवून शैक्षणिक साहित्याद्वारे अंकओळख, अक्षरओळख यांचा सराव घेतला.
विद्यार्थ्यांना आपुलकीने त्यांच्या आवडनिवड, छंद याबाबत विचारपूस करून वातावरण निर्मिती केली.
काही दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले.
कर्णबधिर विद्यार्थ्यांसोबत विशिष्ट हावभाव व हातवारे करून संभाषण साधले.
विद्यार्थ्यांनी केलेले गायन व सादर केलेल्या विशिष्ट बाबींचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.
शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला यांचे सोबत हितगुज केले.
गावातील ग्रामस्थ व पालक यांची भेट घेऊन गावाच्या भौगोलिक परिस्थिबाबत माहिती जाणून घेतली आणि सर्वांना शिक्षणाचे महत्त्व समजावून देत शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले.
शाळेवरील शिक्षक श्री.नितीन वाघ सर यांच्या प्रामाणिक पणाचे व कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
मा.रणदिवे साहेब व केंद्रप्रमुख श्री.सूर्यवंशी सर यांचे सोबत नवीन शाळेच्या विकासासाठी विविध उपक्रम व उपाययोजना याविषयी चर्चा केली.
*यानंतर मा.प्राचार्य डॉ.विद्या पाटील मॅडम यांनी सानेगुरुजी माध्यमिक विद्यालय, विखरण येथील विशेष उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण डिजिटल सायन्स लॅब ला भेट दिली.* तेथील उपक्रमशील विज्ञान शिक्षक *श्री.नरेंद्र कापडे सर* यांनी प्रत्यक्षिकाद्वारे सादर केलेल्या लॅबविषयीच्या सविस्तर मॉडेल विषयी समजावून घेत चर्चा केली व त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
✅ *या संपूर्ण शैक्षणिक भेटीदरम्यान मा.प्राचार्य डॉ.विद्या पाटील मॅडम यांच्या सोबत आलेले अनुभव आणि आणि त्यांची कार्यशैली मला (सचिन जडिये) विषयसाधनव्यक्ती या भूमिकेसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरली.*
✍ *प्रत्यक्ष अनुभव व संकलन*✍
*सचिन जडिये*
*विषयसाधनव्यक्ती,*
*BRC, शिरपूर*
हो राकेश आला शैक्षणिक प्रवाहात
आजरोजी विखरण -,अर्थे दरम्यान विखरण शिवारात श्री. लोटन निळकंठ पाटील ,शेतमालक यांचे शेतातील ट्रॅक्टर ड्राईवर श्री मंगा पावरा (मूळ - मध्यप्रदेश) हल्ली मु. बुडकी ता. शिरपूर यांचा मुलगा राकेश ,अंदाजे वय 11 वर्षे, आज रोजी भेटला ,शेतमालक यांचेशी चर्चा केली. त्याच्या वडिलांना त्यांनी बोलावून घेतले. मुलाला खूप समजविले, त्याचे वडील आलेवर शेतमालक व वडील म्हटले की, आम्ही मागच्या वर्षी याला शाळेत टाकण्याचा प्रयत्न केला परंतू याला सिकलसेल चा आजार असल्याने हॉस्टेल मध्ये घेतले नाही. मुलाशी चर्चा केली, त्याला सायकल चालवता येते, मुलगा चांगला आहे, मी सायकल देण्याचे त्याला आश्वासन दिले. SSA चे IED समनवयक श्री सचिन यांचेशी तेथूनच संपर्क साधला, 30 नोव्हेंबर ला Dr. अनिता हेगडे मॅडम धुळे येथे येत आहेत त्यांची appoinment घेतली.
श्री नरेंद्र कापडे, साने गुरुजी माध्य. विद्यालय विखरण यांना दुरध्वनीद्वारे संपर्क साधून सदर मुलाला आजच वयानुरूप इ.5 वी मध्ये प्रवेश द्यावा याबाबत सूचना दिल्या. शिक्षणाबाबत पालक/ शेतमालक खूपच आग्रही दिसले याची परिणीती आजच दिसून आली.
आपण कुठेतरी कमी पडत आहोत याचे सल मात्र मला आजही आहे.
सर्व शिक्षकवृंदांना या निमित्ताने विनम्र विनंती की ,आपणही उघड्या नजरेने समाजाकडे बघा!! अशी कितीतरी मुले आहेत, त्यांच्यासाठी,त्यांना शालेय प्रवाहात आणणेसाठी प्रयत्न करा.......
प्रयत्नाने वाळूचे कण रगडीता,तेलही गळे!!!
P Z Randive
गटशिक्षणाधिकारी
पं. स. शिरपूर
सोलर डिजिटल स्कूल उदघाटन सोहळा वरुळ येथे संपन्न झाला
🔮 *सोलर डिजिटल स्कुल उदघाटन सोहळा व बीटस्तरीय शिक्षण परिषद* 🔮
🗓 *दि.15/09/2018 शनिवार*
⛳ *स्थळ :- जि.प.शाळा वरूळ, ता.शिरपूर, जि.धुळे*
🏮 जि.प.शाळा वरूळ, ता.शिरपूर येथे सोलर डिजिटल स्कुलचे उदघाटन करण्यात आले. डिजिटल वर्गखोल्या असलेल्या जि.प.शाळा वरूळ, विखरण व कुवे या तीन शाळांना सोलर पॅनलचे वितरण करण्यात आले.
🎀 *कार्यक्रमाचे उदघाटन मा.विनयजी सहस्त्रबुद्धे (खासदार, राज्यसभा)* यांनी केले. तसेच सोलर पॅनलचे वितरण ज्यांच्या सौजन्याने करण्यात आले ते *मा.हर्षलजी विभांडीक (रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई)* व प्रमुख पाहुणे म्हणून *मा.प्रकाशजी पाठक (भोसला मिलिटरी स्कुल, नाशिक)* उपस्थित होते. यासोबत कार्यक्रमासाठी सन्माननीय *जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य* तसेच *मा.दिपकभाऊ गुजर (माजी उपसभापती, पं.स.शिरपूर), मा.प्रमोदजी पटेल (अध्यक्ष, इंग्लिश मेडीयम स्कुल, वरूळ) मा.पी.झेड.रणदिवे साहेब (गटशिक्षणाधिकारी, पं.स.शिरपूर),* तसेच गावातील प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ, विखरण बिटातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व BRC कर्मचारी उपस्थित होते.
🥁 लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. वरूळ शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत गायन केले.
🏮 *मा.पी.झेड.रणदिवे साहेब (गटशिक्षणाधिकारी)* यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात साहेबांनी शिरपूर तालुक्याने डिजिटल शाळांबाबतीत केलेल्या प्रगतीचा इतिहास वर्णन केला. काही झोपडीत भरणाऱ्या शाळासुद्धा डिजिटल करून विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ होण्याची यशोगाथा मांडली. सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमांनी या नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेत कौतुक केल्याचे साहेबांनी सांगितले. तालुका 100% डिजिटल करण्यात मोलाचे योगदान केलेले *मा.हर्षलजी विभांडीक हे आपले विद्यार्थी असून त्यांच्या कार्याचा अभिमान असल्याचा उल्लेखही मा.रणदिवे साहेबांनी आवर्जून केला.*
🏮 *मा.विनयजी सहस्त्रबुद्धे (खासदार, राज्यसभा)* यांनी आपल्या भाषणात मा.हर्षलजी विभांडीक व मा.रणदिवे साहेबांचे कौतुक करून अभिनंदन करीत त्यांच्या कार्याची दखल घेतली. शिरपूर तालुका हा अत्यंत दुर्गम, आदिवासी भाग असून 100% शाळा डिजिटल करणे हे जवळपास अशक्यप्राय गोष्ट होती. असे असतांना सुद्धा अतिशय बिकट परिस्थितीत मा.हर्षलजी विभांडीक तसेच मा.रणदिवे साहेब व त्यांच्या टीमने गाव, वस्ती, पाडे, तांडे या ठिकाणी जाऊन कधी दिवसा तर कधी रात्री प्रेरणा सभा, लोकसभा घेऊन लोकांना डिजिटल शाळेचे महत्व पटवून दिले आणि लोकसहभागातून शिरपूर तालुक्यातील 100% शाळा डिजिटल करून दाखवल्या. यामुळे विद्यार्थी पटसंख्या तर वाढलीच, शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थी अध्ययन करू लागले. लॅपटॉप, संगणक, प्रोजेक्टर सहजरित्या हाताळू लागले. आणि ही परिवर्तनाची लाट निश्चितच सर्वांना प्रेरणा देणारी ठरली. डिजिटल शाळेसाठी सोलर पॅनलचे महत्व विशद करून येत्या काळात *शिरपूर तालुक्यातील 100 शाळांना सोलर पॅनलचे मोफत वितरण* करण्याची घोषणा केली. तसेच स्वच्छता अभियान बाबत माहिती दिली.
🏮 *मा.हर्षलजी विभांडीक* यांनी सोलर पॅनलची संकल्पना स्पष्ट करून येत्या काळात डिजिटल शाळांचे रूपांतर सोलर डिजिटल शाळेत परावर्तित करण्याची योजना सांगितली. वारंवार होणाऱ्या खंडित विज पुरवठेमूळे डिजिटल वर्गाध्यापनात व्यत्यय येत होता, ही बाब निदर्शनात आल्यावर शाळा नुसत्या डिजिटल करून उपयोग नाही, तर खंडित विजपुरवठ्याचा प्रश्न दूर करणे गरजेचे होते. यासाठी शाळांवर सर्वेक्षण करून एक प्रकारचा स्थायी वीजपुरवठा शाळेस उपलब्ध करून देण्याचे मनात आले आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी सोलर पॅनल द्वारे ऊर्जा मिळून वर्ग अखंडपणे सुरळीत सुरू राहील यासाठी कार्याला सुरुवात केली असे त्यांनी सांगितले.
🏮 *मा.प्रकाशजी पाठक* यांनी त्यांचे अनुभव कथन करून सोलर डिजिटल स्कुल संकल्पनेचे कौतुक केले. तंत्रज्ञानाची कास धरून व कालानुरूप होणारे परिवर्तन स्वीकारल्यास विद्यार्थ्यांचे अध्ययन नैसर्गिकरित्या होण्यास मदत होते असे त्यांनी सांगितले. या महत्वाकांक्षी प्रकल्पास शुभेच्छा दिल्या.
📕 यानंतर सर्व प्रमुख पाहुणे, पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी वरूळ गावात जाऊन काही ठिकाणी स्वच्छता करून स्वच्छता अभियानाची सुरुवात केली.
📕 या कार्यक्रमा नंतर विखरण बिटाची मासिक *शिक्षण परिषद घेण्यात आली. यात *मा.रणदिवे साहेब* यांनी शाळांचा अध्ययन स्तर आढावा घेतला. तसेच शिक्षकांनी आपल्या कौशल्याचा व शैक्षणिक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. डिजिटल वर्गाध्यापन बाबत मार्गदर्शन केले.
📕 तसेच नुकतेच LBL (Level Base Learning) च्या प्रशिक्षणाचे अनुभव कथन प्रशिक्षणार्थ्यांनी केले व LBL चे स्वरूप स्पष्ट केले.
📕 शेवटी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या कॅम्प विषयी माहिती देण्यात येऊन शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.
📘 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.रणदिवे साहेबांनी केले
✍🏼 *संकलन व शब्दांकन* ✍🏼
*सचिन जडिये,*
*विषयसाधनव्यक्ती,*
*BRC, शिरपूर*
प्रचार व प्रसिद्ध
श्री. मनोहर वाघ सर,विषय साधनव्यक्ती
9763236070
जिल्हा परिषद शाळा कुळखळी येथे श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला
आज मी जिल्हा परिषद शाळा कुरखळी येथे शाळाभेटी साठी गेलो असता या ठिकाणी एक श्रद्धांजली कार्यक्रम सुरू होता,कुरखळी शाळेवर कार्यरत असलेले स्व.दिपक मुरलीधर मोरे,स्व.प्रमोद मुरलीधर मोरे,स्व.निताबाई भगवंतराव मोरे हे दिनांक १२/९/२००३ रोजी शाळा सुटल्यावर घरी परतीचा प्रवास करीत असताना कुरखळी फाट्याजवळ एक भीषण अपघातात यांचे निधन झाले,त्या घटनेला आज १५ वर्षे झालीत त्या निमित्ताने श्रद्धांजली वाहिली जात होती,तुम्ही म्हणणार यात काय विशेष आहे,होय हा श्रद्धांजली कार्यक्रम विशेषच होता कारण हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा कुरखळी च्या माजी विद्यार्थ्यांनी हया कार्यक्रमाचे आयोजन केले होते ,आज गुरूशिष्य परंपरा व्हॅट्स अँप व फेसबुक च्या जमान्यात कुठेतरी लयास गेले आहे असे चित्र सगळीकडे आपणास दिसत आहे याचं काळात १५ वर्षे पूर्वी दिवंगत गुरुवर्य प्रती ची हि श्रद्धा कौतुक करण्यासारखी आहे,त्यात ते सर्व दिवंगत गुरुजनांचे हे श्रेय आहे त्यांनी बिंबवलले संस्कार ,गुरूप्रेम, आई वडील प्रती आदर,राष्ट्रप्रेम, समाजा प्रती उदात्त भवना ही शिकवण दिसते,या धावपळीच्या जीवनात सुद्धा या सर्व तिघे गुरुवर्य प्रीतीची आस्था कुठेही कमी झालेले नाही,धान्य ते तिघे गुरुजन ,मी म्हणेन ते आज "शहीद" झाले आहेत कारण कर्तव्य पार पडून परतीच्या वाटेवर त्यांना हे वीरमरण आले आहे,जसा जवान राष्ट्र व तिरंग्याच्या सन्मानासाठी आपले सर्वोच्च बलिदान देतो व राष्ट्रभक्ती पोटी शहीद होतो,तसेच शिक्षक देशासाठी आदर्श नागरीक,इंजिनिअर, डॉक्टर, उद्योजक, राजकारणी, आणि "सैनिक" ही घडवतो म्हणून मी त्या सर्व दिवंगत गुरुवर्य यांना "शहीद" म्हटलो कारण शिक्षक हे राष्ट्र निर्माते आहेत,म्हणून मी मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो,आणि कुरखळी गावातील सर्व माजी विद्यार्थ्यांना धन्यवाद ही देतो.
शांती ! शांती !! शांती !!!
श्री.मनोहर वाघ सर
9763236070
12/9/2018
CT प्रशिक्षणानंतरचा एक अनुभव
CT प्रशिक्षणानंतरचा एक अनुभव
गेल्या 5-7 दिवसांपूर्वीची गोष्ट, नेहमीप्रमाणे सकाळी 10 च्या आसपास बसने शिरपुर स्थानकात प्रवेश केला. गाडीतुन उतरतांना खिडकीतुन लक्ष गेले . एक महिला तिच्या लहान बालकाला मांडीवर खेळवत झाडाखाली बसली होती. मांडीवर असलेल्या त्या बाळाची लक्षणे थोडी वेगळी दिसत होती, विशेष शिक्षकाच्या नजरेतुन ती सुटली नाहीत. मी खिडकीतुनच त्या महिलेच्या पतींना विचारले की हा मुलगा चालत नाही का ? त्यावर त्यांनी नकारार्थी मान हलवताच मला मी न चुकल्याचा मनस्वी आनंद झाला. मी खाली उतरून त्यांच्याजवळ गेलो व त्यांची विचारपुस करण्यास सुरुवात केली. त्याचे नाव तुषार विनोद पाटील असुन तो नुकताच 6 वर्षांचा झाला आहे असे त्याचा आईने सांगितले. प्रथम मी त्यांना माझी ओळख करून दिली. तुषार हा Mix learner असुन वैद्यकीय दृष्टया तो Cerebral palsy या प्रकारात मोडतो. मी त्यांना विचारले की तुम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते का? तर ते म्हणाले की हो सर आम्ही घेऊन गेलो होतो. डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते की तुषारला बुद्धी नाही, त्याला काहीच समजत नाही, तुम्ही त्याला तो जेवढे दिवस आहे तेवढे दिवस खाऊ पिऊ घाला. ही सर्व कहाणी तुषारची आई आणि वडिलांनी खुप उद्विग्नपणे संगीतली. ते म्हटले की आम्ही त्याच्यासाठी खुप प्रयत्न केले सर पण काहीच उपयोग झाला नाही.
शेवटी मी माझ्याकडून जे समजवायचे होते ते सांगायला सुरवात केली. सर्वप्रथम मी त्यांना सांगितले की डॉक्टर तुमच्याशी खोटं बोलले की तुषारला बुद्धि नाही. मी त्यांना उलट प्रश्न केला की जर तुषारच्या डोळ्यासमोरून तुम्ही दोघे 30/40 मिनिटांसाठी त्याला दिसेनासे झालात व काही वेळात त्याच्यासमोर आलात तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असते ? आई खूप आनंदाने म्हणाली की सर तो मला पाहुन खुप हसतो व हातपाय हलवतो. मग जर तुषारला बुद्धि नसती तर तो आईला पाहुन हसला असता का ? तो तुम्हाला पाहुन हातपाय हलवतो याचा अर्थ त्याला तुमच्याकडे/ त्याच्या आईकडे यायचं आहे. म्हणजेच त्याची बुद्धि काम करतेय परंतु त्याचे शरीर त्या सूचना एकत नाहीये. हे ऐकून आई अगदीच प्रसन्न झाली आणि म्हणाली की सर तसा तर तो खुपच हुशार आहे. तहान लागल्यावर पाणी असे काहीसे शब्द तो बोलतो. मी सांगितले की तुषार खरच खुप हुशार आहे, त्याचा मेंदू चांगला आहे परंतु त्याचे शरीर त्याला साथ देत नाहीये. म्हणुन आपल्याला त्याच्या शरीराच्या स्नायुंना सक्रिय करायचे आहे त्यासाठी तुमची दोघांची(आई-वडील) मेहनत खुप महत्वाची आहे. सर्वप्रथम येत्या वर्षापासून आपल्याला तुषारला इयत्ता पहिली मधे दाखल करावे लागेल. शाळेत दाखल केल्यामुळे त्याला ज्या सहाय्यभूत साधनांची गरज आहे की ज्यामुळे त्याच्या हालचालीत वाढ होईल ती साधने आपल्याला त्याला शाळेच्या माध्यमातुनच उपलब्ध करता येतील. तसेच आपल्याला त्याला सुरवातीलाच अक्षरलेखन,वाचन, अंक ओळख ही कौशल्य शिकवायची नाहीत तर त्याला आपण त्याच्या गरजेनुसार शिकवणार आहोत. आज तुषारची गरज ही आहे की त्याला स्वतःच्या हाताने जेवण करता यायला हवे, कपडे घालता यायला हवेत, शी-शू सारख्या क्रिया त्याला सांगता यायला हव्यात. पालकांना हे म्हणणे पटले की हो सर ह्याच कौशल्यांची त्याला सद्द्या गरज आहे. आपल्याला त्याला स्वावलंबी बनवायचे आहे की जेणेकरून तो त्याच्या दैनंदिन क्रियांसाठी पालकांवर अवलंबून राहायला नको, कारण आज तुम्ही (आई -वडील) हयात आहात म्हणुन ठीक आहे, भविष्यात तुम्ही गेल्यानंतर त्याचे काय ? म्हणुन त्याला आत्मनिर्भर करणे प्रथम गरजेचे आहे हे समजावून सांगितले. मी तुषारचे हात पाय थोडे दाबुन पाहिलेत की जेणेकरून त्याला किती तीव्र संवेदना जाणवतात, हे सर्व करतांना त्याच्या चेहऱ्यावर मला एक विलक्षण आनंद जाणवला जी माझ्या खऱ्या कामाची पावती होती. फिजियोथेरेपी द्वारे त्याचे स्नायु सक्रीय होऊ शकतील म्हणुन त्याला सतत फिजियोथेरेपी कशी द्यावी याची प्राथमिक माहिती प्रत्यक्ष कृतीद्वारे त्यांना करून दाखवली.
तब्बल 30 ते 35 मिनिटे त्या पालकांशी हितगुज साधल्यावर त्यांना जे समाधान मिळाले ते शब्दात मांडणे निव्वळ अशक्यच. तुषार हा हनुमंतखेडे ता. एरंडोल जिल्हा जळगाव येथील आहे. तो कुठला आहे याचा मला काही फरक पडत नाही कारण मी दिव्यांग मुलांसाठी काम करतो मग मला तालुक्याची, जिल्ह्याची सीमा का म्हणुन आडवी यावी ? तो निव्वळ माझ्या कार्यक्षेत्रातला नाही म्हणुन मी त्याला तशाच अवस्थेत सोडून देणे हे मला न पटणारे होते. माझ्याच गावचे आमचे जेष्ठ सहकारी गुरुदास शिंपी हे एरंडोल गट साधन केंद्रात समावेशित साधनव्यक्ती या पदावर कार्यरत आहेत. मी लगेच त्यांना फोन करून सर्व माहिती सांगितली की सर तुषार हा खुप हुशार विद्यार्थी आहे त्याला इयत्ता पहिलीला येत्या वर्षी नक्की दाखल करा व त्याला आवश्यक ते सहाय्यभूत साधने उपलब्ध करून द्या. सरांनीही माझ्या शब्दाला मान देऊन मला शब्द दिला की सर काही दिवसात मी स्वतः त्याची गृहभेट घेऊन सर्व माहिती घेतो व येत्या वर्षात त्याला शाळेत दाखल करून शक्य ते सर्व प्रयत्न मी करत राहीन. आपल्या जिल्ह्यातील आकडी मष्तिष्क शिबिरातही त्याला उपस्थित ठेवावे हा मानस आहे त्यादृष्टीने त्याला आणावे यासाठी मी सर्व माहिती त्यांना लिहून दिलेली आहे.
CT चे प्रशिक्षण मी प्रभावी पणे घेतल्यामुळेच आज मी जे काही देऊ शकलो त्यामुळे तुषारच्या पालकांना आता एवढे तर नक्की समजले की माझ्या मुलाचा मेंदू हा चांगला असुन तो अजुनही खुप काही शिकु शकतो ही भावना त्यांच्या मनात जागृत झाली त्यामुळे तुषार आता येत्या वर्षापासून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सक्रीयपणे सहभागी होणार आहे. त्यामुळे तुषार नक्कीच उपचार व थेरेपीला प्रतिसाद देऊन एक दिवस स्वावलंबी होईल असा आत्मविश्वास नक्कीच आहे.
*श्री राहुल पाटील*
*विशेष शिक्षक,*
*गट साधन केंद्र शिरपुर.




